संपूर्ण राज्यात सक्षम मनुष्यबळ आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करण्यासाठी एक महत्वाकांक्षी पोर्टल तयार करण्यात आले आहे. महाजोब्स च्या रूपाने कंपन्या व कुशल, अर्धकुशल व अकुशल कामगारासाठी महादुवा महाराष्ट्र शासनाने निर्माण केला आहे. या मध्ये १७ क्षेत्रात ९५० हून अधिक व्यवसायामध्ये रोजगाराची संधी असणार आहे. या जॉब पोर्टल चे उद्घाटन दि. ६ जुलै २०२० रोजी माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते झाले.
महाजोब्स पोर्टल कसे वापरावे?
जॉब्स शोधाणारयासाठी व उद्योजकांसाठी असे लोगिन चे दोन पर्याय देण्यात आलेले आहे. जॉब्स च्या शोधात असणारयांनी या पोर्टल वर तपशीलवार नोंदणी करून माहिती भरणे आवश्यक आहे. ती नोंदणी कशी करायची या विषयी सविस्तर माहिती खालील Video मध्ये देण्यात आलेली आहे.
भूमिपुत्रांना च संधी
राज्यातील भूमिपुत्रांना संधी उपलब्ध असावी म्हणून या पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे.
Domicile Certificate (अधिवास प्रमाणपत्र) बंधनकारक केल्यामुळे बऱ्याच जणांना प्रमाणपत्रा अभावी नोंदणी करता येत नाही व सध्या परीस्थी मध्ये बाहेर पडून तत्काळ प्रमाणपत्र काढणे हे हि कठीण झाले आहे. त्यामुळे Online Domicile प्रमाणपत्र काढता येते सर्व कागद पत्राची पूर्तता असेल तर ७ ते १५ दिवसाच्या आत ते मिळू शकते. हे प्रमाणपत्र Online कसे काढायचे हे खालील Video द्वारे सांगितलेले आहे.
How to Apply Online for Domicile, Caste, Non-Creamy Layer, Income Certificate? | Apply through Mobile
डोमिसाईल प्रमाणपत्र असणारयाची पण काही अडचणी आहे.
जे डोमिसाईल प्रमाणपत्र अलीकडच्या काळात काढलेले आहे त्या प्रमाणपत्रावर बार कोड असतो व त्यावर १० ते १२ अंकी एक नंबर असतो. सुरुवातीला पोर्टल वर फक्त हाच नंबर स्वीकारत होते त्यामुळे ज्यांच्या कडे जुने प्रमाणपत्र होते त्यांची अडचण होत होती. परंतु काही दिवसात जुने नंबर सुद्धा Accept होयला लागले. त्यामुळे आपल्या प्रमाणपत्रावर असलेला नंबर कोणतेही Special Character व स्पेस न टाकता टाकावा. उदाहरण :- DC 2008/A/004/2350 (टीप. जिल्ह्यानुसार बदलू शकतो)असे असल्यास DC2008A0042350 अशा प्रकारे टाकावा व प्रमाणपत्राची PDF फाईल अपलोड करावी
याच प्रकारच्या काही अडचणी सोडवण्याचा प्रयत्न खालील Video द्वारे करण्यात आलेला आहे.
Mahajobs Portal Problem Invalid Domicile Problem Solved | जुने डोमिसाईल नंबर कसे टाकायचे?
Mahajobs Portal registration Problem Solution | नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी चे Solution
खात्रीने जॉब मिळेल का ?
या पोर्टल वर नोंदणी केली म्हणजे नक्की जॉब मिळेल असे नाही. हे पोर्टल Employer आणि Emplyee या मधील दुवा आहे. तरीही ज्या प्रमाणत बेरोजगारांनी या पोर्टल वर नोंदणी केली आहे त्या प्रमाणत कंपन्यांनी नोंदणी केलीली आढळत नाही. याला कदाचित सध्याची परिस्थिती कारणीभूत असू शकते. मुंबई-पुणे मधील छोट्या मोठ्या किती तरी कंपन्या आहेत. येथील नोंदणी होणे अपेक्षित आहे. तरी हि ज्यांना नौकरीची गरज आहे त्यांनी आपल्याकडे असलेले स्कील, शिक्षण, व अनुभवाच्या आधारावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. या साठी आपल्याकडे असलेले स्कील, शिक्षण, व अनुभव Resume/CV द्वारे योग्य पद्धतीने मांडता आले पाहिजे. खालील Video द्वारे Attractive Resume कसा तयार करावा हे सांगितलेले आहे.
Build an Attractive Resume in 5 minutes | फक्त ५ मिनिटात Resume तयार
MAHAJOBS PORTAL महाजोब्स पोर्टल
हेल्प लाईन न.
022-61316405 mahajob.support@mahait.org
All the Best धन्यवाद.!!!!

No comments:
Post a Comment