Tuesday, 21 July 2020

SSC (10 वी )

१० वीच्या विद्यार्थ्यांची कल /अभिक्षमता चाचणी निकाल कसा बघायचा ?



10 वी नंतर चा शिक्षणाचा प्रवास अत्यंत महत्वाचा असतो. आवडीनुसार व क्षमतेनुसार जर क्षेत्र निवडले तर यश हमखास मिळते. त्यामुळे दर वर्षी 10 वी च्या विद्यार्थ्यांची कल/अभिक्षामता चाचणी घेतली जाते. त्यामध्ये आवड, छंद, बौद्धिक क्षमता, तार्किक इतर क्षमता आपल्या लक्षात येतात त्यानुसार आपण कोणते क्षेत्र निवडले पाहिजे हे ठरविता येते. वरील व्हिडीओ मध्ये कल चाचणी चा result कसा बघायचा व करिअर च्या कोणकोणत्या वाटा आहे हे सांगितलेले आहे. 



11th (FYJC) Centralised Online Admission Process 2020-21 Maharashtra | 11 वी प्रवेश प्रक्रिया Demo


येणाऱ्या काही दिवसात इयत्ता १० वीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर ११ वी ची Online प्रवेश प्रक्रिया सुरु होते. ११ वी चा प्रवेश हे एकत्रित Centralised पद्धतीने होतात. वेळेवर Online फोर्म कसा भरावा व त्या मध्ये काय काय असते याचा गोंधळ वाढतो. त्यामुळे आताच याचा सराव केला तर कोणतीही अडचण येत नाही  या Online प्रवेश प्रक्रिया चा वेबसाईट वर प्रवेश फोर्म कसा भरावा हे या द्वारे सांगितलेले आहे. 







11 th Online Admission Process 2020-21| SEBC (मराठा) आरक्षण १६% एवजी १२% शासन निर्णय २३/०६/२०२०



11th Online Admission Process 2020-21 New Rules शासन निर्णय दि. २३/०६/२०२०
1) SEBC (मराठा) आरक्षण १६% एवजी १२%
२) अपंग/दिव्यांग आरक्षण ३% वरून ४%
३)Online प्रवेश शुल्क
Download GR:-

https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006231840367421.pdf

Tuesday, 14 July 2020

Maharashtra HSC/SSC Result

Step by Step Online Application for Verification of Marks / Photocopy of Answer Book / Revaluation of Answer Book / Migration Certificate




 

ऑनलाईन अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावरील विहित नमुन्यात प्रत्येक परीक्षेच्या वेळी ऑनलाईन निकाल जाहीर केल्याच्या दिनांकापासून १० दिवसांपर्यंत करणे आवश्यक राहील.

Web Site
 १० वी  http://verification.mh-ssc.ac.in
 १२ वी  http://verification.mh-hsc.ac.in


  12th (HSC) Verification/Revaluation/Migration Certificate | गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन सूचना 



   





 महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता व १० वी चा निकाला ३१ जुलै पर्यंत अपेक्षित आहे.

इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता


निकाल कसा व कुठे बघायचा?




जेव्हा निकाल लागेल तेव्हा खालील वेब साईट वर निकाल बघू शकतात.


विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा क्रमांक (Maharashtra Board examination roll number) आणि आईचे नाव (Mother's first name) पोर्टल वर टाकायचा आहे त्यांतर result PDF स्वरुपात घेवू शकतो.


४) SMS द्वारे निकाल 
SMS द्वारे सुद्धा निकाल बघता येईल खालील प्रमाणे मेसेज पाठवावा.

MH<exam name> <Seat No.> and send it to 57766


For more related details, students are advised to visit the above official site


सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा..!! All the best!!


Monday, 13 July 2020

RTE 25% For Students

आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२०२२



शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे प्रवेश प्रक्रिया हि सुरु झालेली आहे. आर.टी.ई. 

शैक्षणिक वर्ष २०२१-२२  वेळापत्रक 


RTE 25% Online Application 2021-22अर्ज कसा भरावा? Step by Step










प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे त्यांनी शाळेने दिलेल्या तारखेला शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा आहे



प्रवेश प्रक्रिया कशी असेल ते या Video द्वारे सांगितलेले आहे 

 

 १) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे त्यांनी शाळेने दिलेल्या तारखेला शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा आहे.

Download Notification

२) लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेज (SMS ) द्वारे कळविला जाईल. परंतु पालकांनी फक्त मेसेज (SMS) वर अवलंबून राहू नये. आर.टी.ई.पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा.

RTE25% 2020-21 IMP Updates: प्रवेश दिनांक (Appointment) कशी बघायची? How to download Allotment latter


 


 ३) शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.

४) शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

५) पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
    a) प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती
    b) आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट                          लेटर(Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.

RTE 25% Admission Imp Documents (आवश्यक कागदपत्र)


"प्रतीक्षा यादी (Waiting List ) मधील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता सध्या शाळेत जाऊ नये .त्यांच्या करिता स्वतंत्र सूचना आर.टी.ई.पोर्टलवर नंतर दिल्या जातील" अशी सूचना RTE पोर्टल वर देण्यात आलेली आहे. तर प्रतीक्षा यादी (Waiting List ) मधील पाल्यांचा नंबर हे प्रथम फेरीतील प्रवेश झाल्यावर होतील.

RTE 25% प्रवेश पात्रता व प्रतीक्षा यादी 2020-21 कशी बघायची ?




RTE 25% Waiting List मध्ये नंबर लागेल का?

प्रथम फेरी मध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाही त्यांच्या जागेवर उर्वरित Waiting List मधील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.




MAHAJOBS PORTAL महाजोब्स पोर्टल


Mahajobs Portal (महाजोब्स पोर्टल)

संपूर्ण राज्यात सक्षम मनुष्यबळ आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करण्यासाठी एक महत्वाकांक्षी पोर्टल तयार करण्यात आले आहे. महाजोब्स च्या रूपाने कंपन्या व कुशल, अर्धकुशल व अकुशल कामगारासाठी महादुवा महाराष्ट्र शासनाने निर्माण केला आहे. या मध्ये १७ क्षेत्रात ९५० हून अधिक व्यवसायामध्ये रोजगाराची संधी असणार आहे. या जॉब पोर्टल चे उद्घाटन दि. ६ जुलै २०२० रोजी माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते झाले.

महाजोब्स पोर्टल कसे वापरावे?

जॉब्स शोधाणारयासाठी व उद्योजकांसाठी असे लोगिन चे दोन पर्याय देण्यात आलेले आहे. जॉब्स च्या शोधात असणारयांनी या पोर्टल वर तपशीलवार नोंदणी करून माहिती भरणे आवश्यक आहे. ती नोंदणी कशी करायची या विषयी सविस्तर माहिती खालील Video मध्ये देण्यात आलेली आहे.

Mahajobs Portal Online registration | महा जॉब्स पोर्टल वर नोंदणी कशी करायची? | How to search jobs?


 

भूमिपुत्रांना च संधी


राज्यातील भूमिपुत्रांना संधी उपलब्ध असावी म्हणून या पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे.

Domicile Certificate (अधिवास प्रमाणपत्र) बंधनकारक केल्यामुळे बऱ्याच जणांना प्रमाणपत्रा अभावी नोंदणी करता येत नाही व सध्या परीस्थी मध्ये बाहेर पडून तत्काळ प्रमाणपत्र काढणे हे हि कठीण झाले आहे. त्यामुळे Online Domicile प्रमाणपत्र काढता येते सर्व कागद पत्राची पूर्तता असेल तर ७ ते १५ दिवसाच्या आत ते मिळू शकते. हे प्रमाणपत्र Online कसे काढायचे  हे खालील Video द्वारे सांगितलेले आहे.

How to Apply Online for Domicile, Caste, Non-Creamy Layer, Income Certificate? | Apply through Mobile




डोमिसाईल प्रमाणपत्र असणारयाची पण काही अडचणी आहे.

जे डोमिसाईल प्रमाणपत्र अलीकडच्या काळात काढलेले आहे त्या प्रमाणपत्रावर बार कोड असतो व त्यावर १० ते १२ अंकी एक नंबर असतो. सुरुवातीला पोर्टल वर फक्त हाच नंबर स्वीकारत होते त्यामुळे ज्यांच्या कडे जुने प्रमाणपत्र होते त्यांची अडचण होत होती. परंतु काही दिवसात जुने नंबर सुद्धा Accept होयला लागले. त्यामुळे आपल्या प्रमाणपत्रावर असलेला नंबर कोणतेही Special Character व स्पेस न टाकता टाकावा. उदाहरण :- DC 2008/A/004/2350 (टीप. जिल्ह्यानुसार बदलू शकतो)असे असल्यास DC2008A0042350 अशा प्रकारे टाकावा व प्रमाणपत्राची PDF फाईल अपलोड करावी 

याच प्रकारच्या काही अडचणी सोडवण्याचा प्रयत्न खालील Video द्वारे करण्यात आलेला आहे.

Mahajobs Portal Problem Invalid Domicile Problem Solved | जुने डोमिसाईल नंबर कसे टाकायचे?

Mahajobs Portal registration Problem Solution | नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी चे Solution


खात्रीने जॉब मिळेल का ?

या पोर्टल वर नोंदणी केली म्हणजे नक्की जॉब मिळेल असे नाही. हे पोर्टल Employer आणि  Emplyee या मधील दुवा आहे. तरीही ज्या प्रमाणत बेरोजगारांनी या पोर्टल वर नोंदणी केली आहे त्या प्रमाणत कंपन्यांनी नोंदणी केलीली आढळत नाही. याला कदाचित सध्याची परिस्थिती कारणीभूत असू शकते. मुंबई-पुणे मधील छोट्या मोठ्या किती तरी कंपन्या आहेत. येथील नोंदणी होणे अपेक्षित आहे. तरी हि ज्यांना नौकरीची गरज आहे त्यांनी आपल्याकडे असलेले स्कील, शिक्षण, व अनुभवाच्या आधारावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. या साठी आपल्याकडे असलेले स्कील, शिक्षण, व अनुभव Resume/CV द्वारे योग्य पद्धतीने मांडता आले पाहिजे. खालील Video द्वारे Attractive Resume कसा तयार करावा हे सांगितलेले आहे.

Build an Attractive Resume in 5 minutes | फक्त ५ मिनिटात Resume तयार



MAHAJOBS PORTAL महाजोब्स पोर्टल 


हेल्प लाईन न.

022-61316405  mahajob.support@mahait.org

All the Best धन्यवाद.!!!!



Friday, 10 July 2020

SARAL SCHOOL PORTAL सरल शाळा पोर्टल



  • SARAL School Portal: २०२०-२१  स्कुल पोर्टल वरील माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध. 
१. मुख्याध्यापक यांनी स्कुल पोर्टलला लॉगिन केल्यानंतर स्क्रीन स्टेटस फॉर्म दिसेल. सदर फॉर्म च्या शेवटी check last data या बॉक्सवर क्लिक करावे. त्यानंतर आपणास मागील वर्षी स्कुल मध्ये भरलेली सर्व माहिती पाहावयास मिळेल. सदर माहिती प्रथम तपासून घ्यावी. माहिती तपासल्यानंतर I have read all information ही सूचना दिसेल त्यावर क्लिक करून submit या बटणावर क्लिक करावे.

२. आपणास पुन्हा screen status form दिसेल. सदर फॉर्मवर स्कुल पोर्टलवरील आवश्यक माहितीचे titles दिसतील. ज्या titles मध्ये शाळेस दुरुस्ती /बदल करावयाचे आहे केवळ तेवढ्याच titles च्या check box वर क्लिक करावे व form च्या शेवटी असलेल्या submit वर क्लिक करावे.

३. आपणास सर्व स्क्रीन्स दिसतील त्यापैकी ज्या titles च्या check box वर यापूर्वी बदल करण्यासाठी क्लिक केलेले आहे तेवढ्याच स्क्रीनमध्ये आपणास बदल करता येईल. आपण सदर स्क्रीनवरील माहितीमध्ये बदल करून अपडेट करून finalize करावी. ४. ज्या स्क्रीन मध्ये आपणास बदल अपेक्षित नाही त्या स्क्रीन मागील वर्षीच्या माहितीसह finalize स्टेटस मध्ये असतील.

५. वर नमूद केलेल्या सुविधांशिवाय माध्यम बदल, शाळेचा प्रकार, शाळेची शिफ्ट, इ. बाबत शिक्षणाधिकारी यांचे लॉगिनवर उपलब्ध आहेत.
वर नमूद केलेली कार्यवाही संच मान्यतेसाठी आवश्यक असल्याने संच मान्यते पूर्वी शाळांनी पूर्ण करावी.

स्कुल पोर्टल वरील माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हि माहिती कशी भरायची हे या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे


  • SARAL Portal: Create Your School Website | सरल पोर्टल च्या मदतीने शाळेची वेबसाईट तयार करा.
सरल पोर्टल द्वारा राज्यातील सर्व शाळांची website तयार झालेल्या आहे. या website मध्ये माहिती अद्यावत कशी करायची व याचा वापर कशा प्रकारे करावा हे या द्वारे सांगितलेले आहे.

 


  • SARAL SCHOOL PORTAL SERIES 1:- Basic Menu Updation Category, Recognition Details, Type of school, etc.
 

  • SARAL SCHOOL PORTAL SERIES 2:- Infra-Structure Menu Updation 
या द्वारे आपणास SARAL SCHOOL PORTAL लोगिन ला Infra-Structure Menu मध्ये Building, Toilet Facility, Water, Playground, Ramp, Electricity, इत्यादी माहिती कशी भरायची हे सांगितलेले आहे. सदर माहिती हि संचमान्यता साठी अत्यंत महत्वाची असते.

 


  • SARAL SCHOOL PORTAL SERIES 3 
या द्वारे आपणास SARAL SCHOOL PORTAL लोगिन ल Pre-Primary, Inspection, Grants and Funds, Committee, Rte Info Menus इत्यादी कशी भरायची हे सांगितलेले आहे. 




  • SARAL SCHOOL PORTAL PART 4 
 या द्वारे आपणास SARAL SCHOOL PORTAL लोगिन ला Facility, Inventory, Transport, Academic, Fee, Bank इत्यादी माहिती कशी भरायची हे सांगितलेले आहे.


 

  • SARAL SCHOOL PORTAL: शाळा पोर्टल माहिती दुरुस्ती 
 शाळा पोर्टल माहिती चुकली असता दुरुस्ती कशी करता येईल हे या Video द्वारे सांगितलेले आहे.


 

Tuesday, 7 July 2020

SARAL STUDENT PORTAL सरल विद्यार्थी पोर्टल

Student Portal


१) सरल Student पोर्टल ला इ. 1ली चे विद्यार्थी कसे अपलोड करायचे हे या व्हिडीओ द्वारे सांगितले आहे. SARAL  STUDENT PORTAL: 1st Std. Student Entry And Upload

   

 २) दर वर्षी नवीन विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत घेण्यासाठी online Transfer Request कशी पाठवावी? व आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांची 
Transfer Request Aprove कशी करावी ? Student Portal: How to send request and approve for student transfer?

   

 ३)बऱ्याच वेळा समोरच्या शाळेने विद्यार्थ्याची ट्रान्स्फर Request Aprove न केल्यामुळे किवा इतर कारणामुळे विद्यार्थी पोर्टल वर डबल होतात. असे विद्यार्थी Delete कसे करायचे हे या द्वारे सांगितलेले आहे SARAL STUDENT PORTAL-DELETE DUPLICATE STUDENTS

 

४) SARAL STUDENT PORTAL : विद्यार्थी माहिती दुरुस्ती व Update Process (Phase-२) Student पोर्टल ला विद्यार्थी माहिती चुकलेली असेल (विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख, जात, आधार नंबर इ ) तर ती दुरुस्त करता येते.

   

 ५)सरल Student पोर्टल मधे मुख्याध्यापक साठी महत्वाचे रिपोर्ट (Adhar Status, Dropbox, New Entry, Out of School, Promotion, Transfer Sanch Manyata Student Catalog status ) कसे बघायचे?

 

६)सरल Student पोर्टल ला विद्यार्थी एका वर्गातून पुढच्या वर्गात Promotion कसे करायचे हे या व्हिडीओ द्वारे सांगितले आहे.

   

 ७)सरल विद्यार्थी पोर्टल : संच मान्यतेसाठी विद्यार्थी कसे फोरवर्ड करायचे ? How to forward students? संच मान्यता अत्यंत महत्वाची भाग आहे व त्यामध्ये विद्यार्थिसंख्या अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे अचूक रित्या विद्यार्थी संच्मान्यते साठी फोरवर्ड होणे गरजेचे आहे.

 

८) SARAL STUDENT PORTAL:--विद्यार्थ्यांचे आधार माहिती कशी अपलोड करायची व अपलोड करताना येणाऱ्या अडचणी चे Solution

   

 ९) ज्या शाळेमध्ये एकापेक्षा जास्त तुकड्या (Divisions) आहे तिथे विद्यार्थी एका तुकडी मधून दुसऱ्या तुकडीमध्ये कसा घ्यायचा हे द्वारे सांगितलेले आहे ARAL STUDENT PORTAL: Change Division